मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना Ladki Bahin Yojana

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून 18 ते 60 वर्षांच्या आर्थिकदृष्ट्या कमजोर महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. यामुळे महिला स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे पालनपोषण स्वतः करू शकतील. आर्थिक सहाय्य: या योजने अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातील. वयोगट: 18 ते 60 वर्षांच्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत.

लाडकी बहीण योजना यादीत नाव कसे शोधावे?

लाडकी बहीण योजनेची मंजूर यादी पोर्टलवर तपासा

  • Step 1: सर्वप्रथम ladakibahin.maharashtra.gov.in वेबसाइटवर जा.
  • Step 2: वेबसाइटच्या होमपेजवर “निवडलेल्या अर्जदारांची यादी” या बटणावर क्लिक करा.
  • Step 3: मंजूर लाभार्थ्यांची यादी नवीन पानावर उघडेल.
  • Step 4: जर तुम्ही योजनेसाठी निवडले असाल तर तुमचे नाव त्या यादीत दिसेल.

लाडकी बहीण योजना अर्ज कुठे करायचा?

लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही अंगणवाडीत जाऊन भरु शकतात. अंगणवाडी सेविकांकडून तुम्ही हा अर्ज भरुन घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड,रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड हे कागदपत्र अपलोड करा.

लाडकी बहीण योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागतात?

  • आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र /जन्म प्रमाणपत्र/शाळा सोडल्याचा दाखला …
  • उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशनकार्ड
  • अर्जदाराचे हमीपत्र
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो

लाडकी बहीण योजना पैसे चेक कसे करायचे?

लाडकी बहीण योजनेत तुम्हाला पैसे मिळाले नाहीत याचे स्टेट्‍स चेक करण्यासाठी तुम्हाला लाभार्थ्यांच्या लिस्टमध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करावे लागेल. जर तुमचे नाव त्या लिस्टमध्ये नसेल तर स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा.

पात्रता

  • 1.महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
  • २. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
  • ३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
  • ४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
  • ५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

१. ज्या महिलेस ऑनलाइन अर्ज करता येत नसेल, त्यांना अंगणवाडी सेविका/पर्यवेक्षिका/मुख्यसेविका/सेतु सुविधा केंद्र/ग्रामसेवक/समुह संसाधन व्यक्ती (CRP) / आशा सेविका/वार्ड अधिकारी / CMM (सिटी मिशन मॅनेजर) / मनपा बालवाडी सेविका / मदत कक्ष प्रमुख / आपले सरकार सेवा केंद्र यांचेकडे ऑनलाइन / ऑफलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असेल. या अर्जासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.

२. अर्जदाराचे नाव, जन्मदिनांक, पत्ता याबाबतची माहिती आधारकार्ड प्रमाणे अचूक भरण्यात यावी. बँकेचा तपशील व मोबाईल नंबर अचूक भरावा.

अपात्रता

  • १. ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top