mahadbt farmer कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य
विभागाचे नाव : कृषी विभाग
कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देणे व शेती मधील उर्जेच्या वापराचे प्रमाण २ किलोवॅट/ हेक्टर पर्यंत वाढविणे.
उद्देश : जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषि यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे.
धोरण : कृषि यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिका द्वारे सहभागीदारांना कृषि यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे
अनुदान: या योजनेतून खालील दिलेल्या कृषि यंत्र / अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देण्यात येईल:
- १) ट्रॅक्टर
- २) पॉवर टिलर
- ३) ट्रॅक्टर/ पॉवर टिलर चलित अवजारे
- ४) बैल चलित यंत्र/अवजारे
- ५) मनुष्य चलित यंत्र/अवजारे
- ६) प्रक्रिया संच
- ७) काढणी पश्च्यात तंत्रज्ञान
- ८) फलोत्पादन यंत्र/अवजारे
- ९) वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे
- १०) स्वयं चलित यंत्रे भाडे तत्वावरील
सुविधा केंद्र: १) कृषि अवजारे बँकेची स्थापना
२) उच्च तंत्रज्ञान , उत्पादन सेवा सुविधा केंद्राची स्थापना *लाभाच्या माहितीसाठी कृपया सोबतचे प्रपत्र पाहावे.
पात्रता: शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे शेतकऱ्याकडे ७/१२ उतारा व ८ अ असावा शेतकरी अनु. जाती , अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक फक्त एकाच औजारासाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास , ट्रॅक्टरचलित औजारासाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक एखाद्या घटकासाठी / औजारासाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ औजारासाठी पुढील १० वर्षे अर्ज करता येणार नाही परंतु इतर औजारासाठी अर्ज करता येईल
उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन २०१८-१९ मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील १० वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही सन २०१९-२० मध्ये इतर औजारासाठी लाभापात्र राहील
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड ७/१२ उतारा ८ अ दाखला खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमाती साठी ) स्वयं घोषणापत्र पूर्वसंमती पत्र
nanaagashe@gmail.com
nanaagashe@gmail.com
nanaagashe@gmail.com*